"बॅन" केलेला सिनेमा वेडा
जफर पनाही
क्वचित सिनेप्रेमी असतील ज्यांना हा दिग्दर्शक माहीत नसावा
सिनेमा फक्त मनोरंजन नाही तर जाणिवेच अंजन आहे, थोडक्यात सिनेमा "कल्पनेपल्याड" आहे फक्त ती "दृष्टी" साधता यायला हवी ....
मला सिनेमा करायचा आहे, मी खूप सारी पुस्तके वाचून काढली, खूप सारे सिनेमे पाहिले, पण समजत नाही कसा सिनेमा करू ?
यावर पनाही उत्तर देतो - तू खूप सारे पुस्तकं वाचली ती त्या लेखकांनी लिहून पूर्ण केले, तू खूप सारे सिनेमे पाहिले ते त्या दिग्दर्शकांनी चित्रित केले आहे..! तुझं काय ?
मग त्यासाठी मी काय करायला हवं ?
पनाही म्हणतात..
ते सांगणं कठीण आहे, तुला त्याचा शोध स्वतःच घ्यावा लागेल
हे वरील संवाद त्यांच्या "टॅक्सी तेहरान" या डॉक्यु-फिक्शन सिनेमातील आहे, हे संवाद इथे लिहण्याचा प्रयत्न एवढाच की सिनेमा करणं "सोपी" गोष्ट नाहीये
इराण मधील मोहसेन मखमलबाफ, अब्बास किआरोस्तमी या महान दिग्दर्शकानंतर प्रभावी दिग्दर्शक म्हणून जफर पनाही यांना ओळखलं जातं, यातून या माणसाची प्रचिती येते,
सत्य समोर आणणाऱ्या आणि इराण मधील परिस्थिती आपल्या दृष्टीतून प्रखरपणे मांडणाऱ्या त्याच्या चित्रपटांच्या आशयावरून (अनेक अल्पकालीन अटकांसह) इराण सरकारशी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, पनाहीला मार्च 2010 मध्ये त्याची पत्नी, मुलगी आणि 15 मित्रांसह अटक करण्यात आली आणि नंतर इराण सरकारविरुद्ध अपप्रचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला
जगभरातील चित्रपट निर्माते, चित्रपट संस्था आणि मानवाधिकार संघटनांचा पाठिंबा असूनही, डिसेंबर 2010 मध्ये पनाहीला सहा वर्षांचा तुरुंगवास आणि कोणताही चित्रपट दिग्दर्शित करणे, पटकथा लिहिणे, इराणी किंवा परदेशी माध्यमांना मुलाखती देणे यावर 20 वर्षांची बंदी घालण्यात आली.
पण ?
तुम्ही कलाकारांना बंद करू शकता पण त्यांच्या विचारांना कधीच नाही, पनाही त्यांच्या अपीलच्या निकालाची वाट पाहत असतानाच त्यांनी "दिस इज नॉट अ फिल्म" बनवली(2011) जेव्हा ते आपल्या स्वतःच्या घरात इराण सरकारने लादलेला तुरुंगवास भोगत होते , ही फ़िल्म त्यांनी व्हिडिओ डायरीच्या स्वरूपात एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) स्वरूपात चित्रित केली. अगदी कोणत्याच घराच्या बाहेर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना माहीत न होता, आणि ती फ़िल्म केकमध्ये पेन ड्राइव्ह लपवून इराणमधून त्याची तस्करी करण्यात आली होती आणि 2011 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली होती .आणि त्या फिल्मची चर्चा जगभर देखील झाली होती, असा हा ध्येय वेडा "जफर पनाही"
या दिग्दर्शकाबद्दल अजून खुप काही लिहायचं आहे, पण त्याचे सगळे सिनेमे पाहिल्यानंतर ...
जफर पनाही यांनी एकूण अठरा चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे यात लघुचित्रपटांचा देखील समावेश होतो,
त्यांचे बहुचर्चित सिनेमे म्हणजे , द व्हाइट बलून, सर्कल, क्रिमसन गोल्ड , ऑफसाईड, थिस इस नॉट अ फ़िल्म , क्लोज कर्टन, टॅक्सी तेहरान , यातल्या काही फ़िल्म इराण मध्ये बॅन आहेत, आणि शेवटच्या तीन फ़िल्म त्यांनी बेकायदेशीर पणे तुरुंगवास भोगत असताना guerrilla methods ने चित्रित केल्या आहेत,
नक्की बघा आणि पोस्ट वाचून प्रतिक्रिया द्या आणि फ़िल्म शेअर करा कारण सिनेमा बघायला हवा आणि रुजवायला हवा.
- Rameshwar jite
Comments
Post a Comment