कुठलाही सिनेमा समजुन घेण्यासाठी आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं असतं, तो कुठे घडतो, तो कुठल्या काळातला आहे, प्रदेश कुठला आहे, थोडक्यात काय तर स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी आपणास दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजायला मदत होते, आणि मग सिनेमाचे तांत्रिक घटक, शैली हे ही तितकंच महत्त्वाचे आहे, म्हणायचं एवढंच की सिनेमा बघत बघत तो आपण शिकणं ही गरजेचं आहे "LAMB" 2021 DIRECTOR - Valdimar Jóhannsson आजचा सिनेमा आहे थेट आइसलँड मधून, या देशाचा अभ्यास केला तर लक्षात येते, की कमी लोकसंख्या असलेला हा देश आणि इथे राहणारे लोकं हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे, आणि दर किलोमीटर अंतरावर जर अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त 3 लोकं 4 या अंतरावर राहतात, थोडक्यात एकलकोंडी आणि कायम कामात व्यस्त राहणारी ही मंडळी आहे, आणि अशाच एका परिवाराची गोष्ट दिग्दर्शकाने आपल्यासमोर काल्पनिक (fantasy) स्वरूपात मांडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे "लॅम्ब" ( मेंढीच पिलू ज्याला आपण कोकरू म्हणतो) इंगमर आणि मारिया हे दोघे आइसलँड मधील एका प्रदेशात एका डोंगराच्या पायथ्याशी राहत ...